जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा
You will recieve mail from competition.parbhani@gmail.com after registration
स्पर्धेचा कालावधी १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आलेला आहे

परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा सेतू समितीतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरीकांसाठी निबंध लेखन स्पर्धा आणि छायाचित्रण (फोटोग्राफी) स्पर्धा आयोजित केली आहे.
सदर स्पर्धेसाठी दिनांक ५ ऑगस्ट २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत प्रवेशिका फक्त ऑनलाईन Online पद्धतीने स्विकारण्यात येणार असून त्याकरीता जिल्हा प्रशासनाने एनआयसीच्या मदतीने एक स्वतंत्र पोर्टल विकसीत केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.collectorpbn.in यासंकेतस्थळावर स्पर्धकांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे प्रकार आणि विषय :
स्पर्धा क्रमांक १ (निबंधलेखन) : परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कलेचा वारसा
स्पर्धा क्रमांक २ (निबंधलेखन) : परभणी : संतांची भूमी
स्पर्धा क्रमांक ३ (निबंधलेखन) : परभणी जिल्ह्यातील ऐतिहासीक आणि प्रेक्षणीय स्थळे
उदा. (खालील कोणतेही एक) नेमगिरी, नवागड, हजरत तूराबुल हक दर्गा, पोखर्णी नृसिंह, पारदेश्वर ,मूदगलेश्वर , पाथरी साईबाबा जन्मरस्थान, चारठाणा मंदिर, धारासूर, गुंज, नैकोटवाडी, वरुड नृसिंह, जांभूळबेट, केशवराज बाबासाहेब मंदीर सेलू किंवा इतर (कोणतेही एक)
स्पर्धा क्रमांक ४ (निबंधलेखन) : परभणी जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व
स्पर्धा क्रमांक ५ (छायाचित्र/फोटोग्राफी) : परभणी जिल्ह्यातील ऐतिहासीक आणि प्रेक्षणीय स्थळे
नविन सहभागासाठी प्रथम New Registration या ऑप्शन द्वारे नोंदणी करा

स्पर्धेच्या नियम व अटी :

१. स्पर्धेसाठी प्रवेशिका फक्त ऑनलाईन Online पद्धतीनेच स्विकारण्यात येतील.

२. आपल्या "यूजर आयडी" आणि "पासवर्ड"ची सुरक्षीतता आणि गोपनियता ही स्पर्धकाची जबाबदारी आहे.

३. एका स्पर्धकास एकापेक्षा जास्त स्पर्धेत सहभाग नोंदविता येईल.

४. एका स्पर्धकास निबंध स्पर्धेसाठी जास्तित जास्त दोन फाईल दाखल करता येतील.

५. एका स्पर्धकास छायाचित्रण स्पर्धेसाठी जास्तित जास्त पाच फाईल दाखल करता येतील.

६. स्पर्धा केवळ मराठी भाषेतच घेण्यात येणार असल्याने इतर भाषेत पाठवीलेल्या प्रवेशपत्रिकांचा विचार केला जाणार नाही.

७. निबंधस्पर्धेसाठी ९०० शब्दांची शब्दमर्यादा आहे.

८. ठरवून दिलेया वेळापत्रकाप्रमाणेच प्रवेशिका ऑनलाईन Online पद्धतीने स्विकारल्या जातील प्रवेशिका स्विकारण्याच्या कालावधीनंतर ऑनलाईन Online सॉफ्टवेअर बंद होईल त्यानंतर कोणत्याही माध्यमातून प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत.

९. संकेतस्थळ बंद असणे / इंटरनेट स्पीड नसणे / ऑनलाईन भरतांना आलेल्या त्रुटी अशा कोणत्याही कारणास्तव ऑनलाईन व्यतीरीक्त प्रवेशिका स्विकारण्यात येणार नाहीत.

१०. स्पर्धेतील सहभागाविषयी ईमेल किंवा दुरध्वनीवर कोणत्याही प्रकारची तक्रार स्विकारण्यात येणार नाही. त्यासाठी कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.

११. निबंध स्पर्धेसाठी पाठविलेला निबंध फक्त पीडीएफ फॉर्मेट (PDF) मध्येच स्विकारण्यात येईल.

१२. "परभणी जिल्ह्यातील ऐतिहासीक आणि प्रेक्षणीय स्थळे" या विषयवरील निबंध स्पर्धेसाठी ऑनलाईन फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या ठिकाणांपैकी एका ठिकाणाची निवड करणे बंधनकारक आहे. त्यापैकी "ईतर" हा पर्याय निवडल्यास त्या ठिकाणाचे नाव व पत्ता देणे बंधणकारक आहे.

१३. छायाचित्रण स्पर्धेसाठी पाठविलेले छायाचित्र (फोटोग्राफ) फक्त जेपीईजी फॉर्मेट (JPEG) मध्येच स्विकारण्यात येईल.

१४. स्पर्धेसाठी पाठविलेले छायाचित्र स्वत:ची मुळ कलाकृती असणे आवश्यक आहे. तसेच हे छायाचित्र स्पर्धकाने स्वत: चित्रीत केलेले असावे. छायाचित्र मागील एक वर्षाच्या कालवधीत चित्रीत केलेले असणे बंधणकारक आहे.

१५. मुळ छायाचित्रात Minor Burning, Dodging, Color Correction, Minor Croping अशा प्रकारचे बदल स्विकारण्यात येतील. परंतू PhotoShop मधुन केलेले मोठे बदल स्विकारण्यात येणार नाहीत.

१६. प्रत्येक छायाचित्राच्या प्रवेशिकेस शिर्षक देणे बंधणकारक आहे. शिर्षक समर्पक असणे आवश्यक आहे. शिर्षकात छायाचित्रातील ठीकाण (गावाचे नाव) आणि तालुक्याच्या नावाचा ऊल्लेख असणे बंधणकारक आहे. शिर्षकात त्रुटी असल्यास छायाचित्र स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

१७. स्पर्धकाकडून इतरांच्या कलाकृतीचे कॉपीराईट उल्लंघन झाल्यास त्याला सेतू समिती जबाबदार असणार नाही.

१८. स्पर्धेसाठी दाखल केलेले साहित्य आणि छायाचित्र यावर सेतू समिती आणि जिल्हाधिकारी, परभणी यांचा संपुर्ण अधिकार राहील. हे साहित्य आणि कलाकृती कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करण्यात स्पर्धकाचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही.

१९. स्पर्धेसाठी पात्र स्पर्धकांची यादी आणी स्पर्धेचा निकाल www.collectorpbn.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. विजेत्या स्पर्धकास मोबाईल व ईमेल द्वारे वैयक्तिक कळविण्यात येईल.

२०. मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत स्पर्धा परीक्षणासाठी तज्ञ परीक्षकांचे पॅनेल नियुक्त केले जाणार आहे या तज्ञ परीक्षकांची नावे स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील. या विषयी सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सेतू समिती यांच्या कडे असतील.

२१. स्पर्धेच्या नियम व अटी तसेच स्पर्धेचा कालावधी, निकालाचे दिनांक यात आयत्यावेळी बदल करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सेतू समिती यांना राखुन ठेवलेले आहेत.

मार्गदर्शक सूचना

सहभागासाठी प्रथम स्पर्धकाने या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी New Registration या ऑप्शन ला क्लिक केल्यानंतर आपले नाव आणि इतर माहिती नोंदवा.

स्पर्धा निकाल

www.collectorpbn.in/compete आणि www.parbhani.gov.in यासंकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल.

स्पर्धा पारितोषक

• निबंध स्पर्धा क्र.१, २, ३ , ४, ५ मध्ये प्रथम येणा-या व्यकतीस १०००/- रु आणि प्रमाणपत्र व व्दीतीय येणा-या व्यक्तीस ५००/- रु आणि प्रमाणपत्र मा.जिल्हाधिकारी यांचे शुभ हस्ते वितरण समारंभ होईल.

• फोटोग्राफी स्पर्धा मध्येण प्रथम येणा-या व्यक्तिस १०००/- रु आणि प्रमाणपत्र व व्दीतीय येणा-या व्यक्ती स ५००/- रु आणि प्रमाणपत्र मा.जिल्हाधिकारी यांचे शुभ हस्ते वितरण समारंभ होईल.

Login
Incorrect username/password

Registrations Are Closed !!!